श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह, दसरा चौक, कोल्हापूर दरवर्षी गौड सारस्वत ब्राह्मण ज्ञातीतील ( सर्व पोटभेदातील) हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे शिष्यवृत्या व पारितोषिके देते.
1) इ. पाचवी ते बारावी- शिष्यवृत्ती.
2) पदविका, पदवी, आणि उच्च शिक्षण घेणार्याना गुणवत्ता शिष्यवृत्ती.
3) संशोधन/ परदेशी शिक्षण घेणार्याना अर्थसहाय्य.
4) पुरस्कृत ठेवीवरील व्याजातून पारितोषिके.
शिवाय
5) पदविका, पदवी आणि उच्च शिक्षण घेणार्याना बिनव्याजी परत फेडीची शिष्यवृत्ती.
तरी पात्र सारस्वत ब्राह्मण ( सर्व पोटभेदातील) हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांनी दिनांक 31 जुलै, 2024 पूर्वी श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह, दसरा चौक, कोल्हापूर येथून विहित नमुन्यातील अर्ज ( व्यक्तीशः किंवा स्वतःचा पत्ता व मोबाईल नंबर सह पोस्ट कार्ड पाठवून) घेऊन आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून दिनांक 14ऑगस्ट, 2024 पूर्वी श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह, कोल्हापूरच्या कार्यालयात जमा करावेत.
पात्र विद्यार्थी एकाच अर्जावरील 1 ते 5 बाबी समोरच्या एकापेक्षा अधिक रकान्या समोर टिक _/ मारून एकापेक्षा अधिक शिष्यवृत्या मिळवू शकतो. मात्र त्या-त्या रकान्या समोर टिक मारणे आवश्यकच आहे, याची नोंद घ्यावी. कारण फक्त टिक असलेल्याच शिष्यवृत्तीचाच मंजुरी करताना विचार होतो हे लक्षात घ्यावे.
वरील शिष्यवृत्ती योजना फक्त "कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी" जिल्ह्यातील विद्यार्थांपूर्ती मर्यादित आहे याची कृपया नोंद घ्यावी.
सारस्वत ब्राह्मण बंधू-भगिनी आणि त्या-त्या भागातील सारस्वत ब्राह्मण ज्ञातीतील संस्थाना विनंती कि, आपण सर्वांनी आपल्या पाल्यांना आणि परिचित सारस्वतांना कृपया अवगत करावे, जेणेकरून अधिकाधिक सारस्वत विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतील.
आपला विनीत,
सुधीर कुलकर्णी
मानद सचिव,
श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह,
दसरा चौक, कोल्हापूर.
टीप:- अधिक माहिती हवी असेल तर 0231 2644111 वर फोन करावा ही विनंती.