सारस्वत बोर्डींग विद्यार्थी निवास प्रवेश प्रक्रिया
आपल्या श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह, कोल्हापूर मध्ये इयत्ता अकरावी पुढील - वसतिगृहात राहण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थ्यांनी वसतिगृह कार्यालयाशी लवकर संपर्क साधून सन 2024 - 2025 करिता प्रवेश निश्चित करावा, कारण जागा मर्यादित आहेत.
वसतिगृहाची वैशिष्ट्ये
माफक फी, सारस्वत विद्यार्थ्यास फी मध्ये 50% सवलत, ग्रंथालय, अभ्यासिका, नीट नेटक्या रंगविलेल्या, स्वच्छ प्रकाश व हवेशीर, फॅन आणि लाईट इ.नी युक्त खोल्या, पिण्यासाठी शुद्ध व अंघोळीसाठी गरम पाणी, आरोग्य तपासणी शिबीर, प्रबोधनपर व्याख्याने, स्नेहसंमेलन क्रिडामहोत्सव, निवासी गुणवंत विद्यार्थ्यांना निवासी शिष्यवृत्ती इत्यादी.
आपला विनित,
सुधीर कुलकर्णी,
मानद सचिव
श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह,
दसरा चौक, कोल्हापूर.
टिप :- अधिक माहिती साठी रविवार व सट्टी सोडून सकाळी 9 ते 01-30 व दुपारी 2-30 ते 06-00 या वेळेत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा फोन करावा ही विनंती.